शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सुप्रीम धक्का; सीबीआय चौकशीस नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 14:46 IST

याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती. मात्र या याचिकेवर सुनावणी घेण्यास न्यायालयानं नकार दिला. अलका प्रिया यांनी ही याचिका दाखल केली होती. सध्या पोलीस सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांना त्यांचं काम करू द्या, असं सर्वोच्च न्यायालयानं अलका प्रिया यांच्या याचिकेवर भाष्य करताना म्हटलं. या प्रकरणाशी अलका यांचा थेट असा कोणताही संबंध नाही. त्यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जावं, अशी सूचना न्यायालयानं केली. त्यामुळे सध्याच्या घडीला तरी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून आता राजकारणही सुरू झालं आहे. या प्रकरणात राज्यातले पोलीस अपयशी ठरल्याची टीका भाजपाचे आमदार राम कदम यांनी केली आहे. तर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंनी बिहार पोलिसांनी तपासात केलेल्या हस्तक्षेपावर हरकत घेतली आहे. ज्या राज्यात घटना घडते, तिथे येऊन तपास करायचा झाल्यास दुसऱ्या राज्यातल्या पोलिसांना परवानगी घ्यावी लागते. मात्र तशी कोणतीही परवानगी बिहार पोलिसांनी घेतलेली नाही. त्यामुळे प्रोटोकॉलची अंमलबजावणी झालेली नाही, असं देसाई म्हणाले.सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी सुशांतची कथित प्रेयसी आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात बिहारमध्ये एफआयआर नोंदवला आहे. त्यामुळे बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत आले आहेत. रियानं सुशांतच्या खात्यातून मोठी रक्कम काढल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला आहे. त्यामुळे आज बिहार पोलीस वांद्र्यातल्या कोटक महिंद्रा बँकेत सुशांतच्या खात्यांची चौकशी करण्यासाठी पोहोचले. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी बिहारमध्येच खटला चालवण्यात यावा, अशी मागणी सुशांतच्या वडिलांनी केली आहे. या प्रकरणी सीबीआयनं तपास करावा, अशीदेखील मागणी त्यांनी केली आहे. मात्र राज्य सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यास नकार दिला आहे. मुंबई पोलिसांकडून प्रकरणाचा तपास व्यवस्थित सुरू असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. तर बिहारचे पोलीस या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा प्रयत्न करतील, अशी भूमिका बिहार सरकारनं घेतली आहे.अंकिता लोखंडेला दिली जाणार पोलिस सुरक्षा? कुणापासून आहे धोका?सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात आता मायावतींची उडी; ठाकरे सरकारला गंभीरतेचा दिला इशारा

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSupreme Courtसर्वोच्च न्यायालय